संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.


त्यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटनुसार संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते आणि ते हरयाणा एसजीपीसीचे नेतेदेखील होते. “मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे,” असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post