माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशाराच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही पत्र लिहिलं आहे. या पत्रातही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे की “शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार.” काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
Post a Comment