माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अंधेरी येथे महाकाली गुंफांना जाण्यासाठी गेली १०६ वर्षे वापरात असलेल्या रस्त्याच्या जागेची मालकी केंद्र सरकारच्या खात्याकडे असताना त्याचा मोबदला खासगी बिल्डरला देण्यासाठी उपयुक्त आदेश काढण्याचा भ्रष्टाचाराचा विक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने करून दाखविला आहे. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा नवा विक्रम.१९१४ चा TDR २०२० मध्ये महाकाली लेण्यासाठी, केंद्र सरकारने २१/०७/१९१४ रोजी करार झालेल्या, ताब्यात घेतलेल्या जमिनीचा, बिल्डर शाहीद बालवा व अविनाश भोसलेच्या कंपनीला ७४ कोटींचा TDR देण्यासाठी २६/०७/२०२० ला ठाकरे सरकारने कायद्यात बदल केला. असं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, या प्रकरणाची कागदपत्रे त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळविल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
या संदर्भात किरीट सोमय्या यांनी सांगितले की, ”ठाकरे सरकारने दि. २६ सप्टेंबर २०२० रोजी एक परिपत्रक जारी केले जेणेकरून महाल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना संबंधित भूखंडाचा मोबदला म्हणून ७४ कोटी रुपये देता येतील. मुंबई महानगरपलिकेने या परिपत्रकाचा आधार घेऊन भूखंडाशी संबंध असलेल्या कमाल अमरोही स्टुडिओचे मालक महाल पिक्चर्स यांना टीडीआरच्या स्वरुपात मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण एका बांधकाम प्रकल्पाशी संबंधित आहे. ते काम करणाऱ्या बिल्डर कंपनीने २०१६ साली महाल पिक्चर्सकडून कमाल अमरोही स्टुडिओ खरेदी केला आहे. शाहीद बलवा, विनोद गोयंका आणि अविनाश भोसले हे या बिल्डर कंपनीचे भागीदार आहेत.”
Post a Comment