माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – रोडवरील टोलनाक्यावर पडलेल्या दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स स्वामीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याला बुधवार, दि.9 अटक करण्यात आली होती. भिंगार येथील त्याच्या अलिशान बंगल्यात पोलिसांनी सकाळी धाड टाकत दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला काल (दि.10) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता. त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सोलापूर रोडवरील टोलनाक्याची तोडफोड व दरोड्यााच्या प्रकरणामध्ये भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये स्वामीचा समावेश असल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. पोलिसांनी बुधवारी सिनेस्टाईल कारवाई करत लॉरेन्स स्वामीला अटक केली. टोलनाका तोडफोड व दरोडा प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये काही जणांना पोलिसांनी या अगोदर अटक केली आहे.भिंगार कॅम्प पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता. लॉरेन्स स्वामी याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक केली. लॉरेन्सच्या गुन्ह्यांची कुंडली तयार -लॉरेन्स स्वामी याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यांची कुंडलीच काढली आहे. त्यामध्ये खंडणी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामार्या, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, पोलिसांकडून आगामी काळात त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
Post a Comment