माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे अभिनेता अक्षयकुमारने त्यांची भेट घेतली आहे.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. 'भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली', असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सिनेविश्वातील एक कलावंत म्हणून अक्षयकुमार यांची सचोटी, समर्पण आणि सकारात्मकता निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत योगींनी अक्षयकुमारचे कौतुकही या ट्वीटमध्ये केले आहे.
Post a Comment