होय, मी आंदोलन करणारच: अण्णा हजारे



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: केंद्रातील मोदी सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी पासूनच्या आंदोलनावर ठाम आहेत.दिल्लीच्या सीमेवर गेल्या 58 दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धी इथं दाखल झाले. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.  यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post