विश्वजीत कासारच्या मुसक्या आवळल्या



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देणारा ओंकार भालसिंग खून प्रकरणातील आरोपी विश्वजीत रमेश कासार यांच्यासह तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणातील आतापर्यंत पाच आरोपी जेरबंद केले असून अजून तीन आरोपी फरार आहेत, त्या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

विश्वजीत कासार यांच्यासह मयूर बापूसाहेब नाईक (वय 20 रा. वाळकी ता.नगर), भरत भिमाजी पवार (वय27, रा. साकत खुर्द ता. नगर) व त्याला मदत करणारा संतोष धोत्रे (रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी येथे मागील भांडणाच्या कारणातून राग मनात धरून मयत ओंकार बाबासाहेब भालसिंग याला दि.17 नोव्हेंबर 2020 ला दुचाकीवर जात असताना समोरून विश्वजीत कासार याने व त्याच्या इतर साथीदारांनी

समोरून वाहनाने धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याला जखमी केले होते. यानंतर जखमी ओंकार भालसिंग याच्यावर पुणे येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असतानाच तो मयत झाला होता. या घटनेनंतर नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं.1123 / 2020 ते भादविक 143, 147, 148, 365, 324, 323, 504, 506 व 302 प्रमाणे विश्वजीत कासार व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो व त्याचे साथीदार फरार झाला होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार सापळा लावून वाघोली (पुणे) हॉटेल श्रध्दा च्या दिशेने येत असताना विश्वजीत कासार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे साथीदारांबाबत चौकशी केली असता त्याच्या माहितीवरून मयूर नाईक, भरत पवार या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. यादरम्यान अधिक चौकशी केली असता त्याला मदत करणारा संतोष धोत्रे (रा कारेगाव ता. शिरूर जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपी विश्वजीत कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर फसवणुकीसारखे अनेक गंभीर गुन्हे कोतवाली, सुपा, एमआयडीसी, कर्जत, पारनेर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, 

पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, विजयकुमार विटेकर, संदीप घोडके, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप पवार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, सचिन आडबल, देवेंद्र शेलार, पोकाॅ कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, संदीप दरंदले, रणजीत जाधव, राहुल सोळुंके, चापोहेकाँ संभाजी कोतकर, चापोना भरत बुधवंत, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post