माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : तत्कालीन सनातन्यांचा विरोध झुगारून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे महान कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केले. त्यामुळेच एकविसाव्या शतकातील महिलांना आज शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
सावित्रीबाई जयंती दिनी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या महिला शिक्षण दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि शिक्षक काँग्रेस, महिला काँग्रेसच्या विशेष पुढाकारातून आयोजित क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी काळे बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान यावेळी काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, डॉ.रिझवान अहमद, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, शिक्षक काँग्रेसचे नेते प्रसाद शिंदे सर, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, कौसर खान, उषा भगत, जरीना पठाण, डॉ.जाहिदा शेख, सेवादलचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, अन्वरभाई सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष चिरंजीव गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काळे यावेळी म्हणाले की, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष शिक्षक, प्राध्यापक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, सावित्रीबाईंनी रूढीवादी प्रतिकूल परिस्थितीत धाडसी पाऊल उचलल्यामुळे स्री शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना समान अधिकार मिळाले. नलिनी गायकवाड म्हणाल्या की, महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवत स्वतःला घडवले.त्याचबरोबर समाजाला देखील दिशा दिली.
यावेळी प्रशांत जाधव, प्रवीणभैय्या गीते पाटील, अमित भांड, प्रमोद अबुज, रवी चांदेकर, निजामभाई जहागीरदार, ॲड.चेतन रोहोकले, अनंतराव गारदे, शंकर आव्हाड, उमेश शिंदे, नितीन शेलार, अजय मिसाळ, आसाराम पालवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद शिंदे यांनी केले. नलिनी गायकवाड यांनी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. आभार चिरंजीव गाढवे यांनी मानले.
Post a Comment