माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी 7 जागांसाठी होणार्या बुर्हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
बुर्हाणनगर येथे ग्रामस्थ, कार्यकर्ते व बाणेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मार्गदर्शन करतांना श्री.कर्डिले बोलत होते. यावेळी प्रकाश पाटील कर्डिले, अक्षय कर्डिले, दत्ता ताकपिरे, हभप मोहिते महाराज उपस्थित होते.
श्री.कर्डिले पुढे म्हणाले, गेली 30 ते 35 वर्षे बुर्हाणनगर ग्रामपंचायत बिनविरोध होत, पण मी केलेला विकास विरोधकांना बघवत नाही. केवळ विरोध म्हणून निवडणूक लादली. विधानसभेला माझा पराभवाचा आनंद फक्त पुढार्यांना झाला, पण सर्वसामान्यांना मात्र दु:ख झाले होते. विकास कामात माझा कोणीच हात धरु शकत नाही. संपूर्ण तालुक्यासह बुर्हाणनगरच्या हद्दीतील उपनगरांमधील पाणीप्रश्न, विजेचा प्रश्न, रस्ते अशा मुलभुत सुविधा सोडविल्या आहेत. जनता पाठिशी असल्याने मला पराभवाची भिती नाही. या ग्रामपंचायत निवडणुकीत सातही उमेदवार विजयी होतील तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Post a Comment