भारतीय संघाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू संघाबाहेर

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुलला मालिकेतून वगळण्यात आलं आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती.


बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. “शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल,” अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post