माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -
मुंबईत डोक्यावर गोळी झाडून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. २६ वर्षीय तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सोमवारी मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या मागे रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ माजली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोळीबारानंतर काही स्थानिकांनी कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर दोघांनाही कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे दाखल होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दोघांच्याही कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या केल्यानंतर तरुणाने मंदिरात स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांचीही ओळख पटली असून राहुल यादव आणि निधी मिश्रा अशी त्यांची नावं आहेत. राहुल हा कांदिवलीचा तर निधी मालाडची रहिवासी होती.
Post a Comment