15 दिवसांपासून वस्ती अंधारात; नागरिकांचा सबस्टेशनवर मोर्चा



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील वाकळी रोडची वस्ती गेल्या 10-15 दिवसांपासून अंधारात आहे. अधिकार्‍यांनी कोणतीही पुर्वसुचना न देता वस्तीवर येणारी सिंगल फेज लाईन कट केली आहे. दरम्यान, याच परिसरात तीन वेळा बिबट्याने दर्शन दिले असल्यामुळे आणि अंधाराचे साम्राज्य तयार झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वीज पुर्ववत करण्याच्या मागणीसाठी वाळकी रोडवरील नागरिकांनी बाबुर्डी बेंद येथील सबस्टेशनवर मोर्चा काढला. 

बाबुडी बेंद परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून सिंगल फेज लाईनचा सावळा गोंधळ सुरु आहे. त्यातच वाळकी रोड वस्तीवरील सिंगल फेज लाईन महावितरणच्या अधिकार्‍यांनी कोणतीही पूर्वसुचना न देता कट केली आहे. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

आमची घरगुती वीज पुर्वीप्रमाणे सुरळित करा या मागणीसाठी सबस्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी खंडेश्‍वर सहकार संस्थेचे उपाध्यक्ष लहू कासार, शिवाजी चोेभे, बाळासाहेब चोभे, सुनील साळवे, शरद चोभे, काळूभाऊ साळवे, अनिल चोभे,महादेव चोभे, बंडू चोभे, पप्पू चोभे, हरि चोभे, चित्राताई चोभे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post