माय अहमदनगर वेब टीम
पुणे ; पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्युट मधील निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी एक महत्त्वाचं निवेदन जारी केलं आहे. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर ज्या मजल्यावर सर्वप्रथम आग लागली होती तिथेच एका खोलीत पुन्हा आग लागली असून ती काही वेळातच आटोक्यात आणली गेली आहे.
सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आज दुपारी आगीचा भडका उडाला. या आगीवर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुरुवातीला या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी केलेल्या पाहणीत शेवटच्या मजल्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांची ओळख पटली असून हे सर्व जण कंत्राटी मजूर होते. साइटवर इलेक्ट्रिकल काम ते करत होते, असे स्पष्ट झाले आहे. रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही उत्तर प्रदेशातील), सुशीलकुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाष्टे (दोघेही पुण्यातील) अशी मृतांची नावे आहेत.
Post a Comment