माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतीम मतदार यादी गुरुवारी (दि.7) प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी 1371 शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था 832, बिगर शेती संस्था 1376 असे एकूण 3 हजार 579 मतदार आहेत.
जिल्हा बँकेच्या पंचवार्षीक निवडणूकीचा कार्यकाल मागील वर्षीय संपुष्टात आला होता. मात्र, राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या कामकाजामुळे जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली होती. या विरोधात काही सेवा संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने राज्य शासनाचा आदेश रद्द ठरवत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आणि जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि.7) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतीम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सेवा सोसायटी मतदार
अकोले 84, जामखेड 47, कर्जत 74, कोपरगाव 114, नगर 109, नेवासा 131, पारनेर 105, पाथर्डी 80, राहाता 73, राहुरी 110, संगमनेर 135, शेवगाव 70, श्रीगोंदा 170, श्रीरामपूर 69 एकूण 1371.
शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदार
अकोले 83, जामखेड 16, कर्जत 22, कोपरगाव 82, नगर 35, नेवासा 28, पारनेर 40, पाथर्डी 15, राहाता 77, राहुरी 37, संगमनेर 325, शेवगाव 26, श्रीगोंदा 32, श्रीरामपूर 14 एकूण 832.
बिगर शेती संस्था मतदार
अकोले 58, जामखेड 48, कर्जत 64, कोपरगाव 132 (34 व्यक्ती सभासद) असे एकूण 166, नगर 222, नेवासा 85, पारनेर 79, पाथर्डी 29, राहाता 114 (25 व्यक्ती सभासद) असे एकूण 139, राहुरी 102, संगमनेर 230 (1 व्यक्ती सभासद) असे एकूण 231, शेवगाव 22, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 62 असे एकूण 1316 संस्था व 60 व्यक्ती सभासद असे 1376 मतदार आहेत.
Post a Comment