'ईडी उद्या मलाही नोटीस पाठवेल'



    माय अहमदनगर वेब टीम

नवी मुंबई:महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून लावण्यात आलेल्या ईडीच्या चौकशांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक भाष्य केलं आहे. 'उद्या ईडी मला सुद्धा नोटीस पाठवेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भाजप असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भाजपला लक्ष्य केलं. 'ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,' असं ते म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post