माय वेब टीम
कोरोना काळातही
स्विट्जरलंडच्या बँकांमध्ये भारतीयांची संपत्ती वाढत आहे. 2020 मध्ये हा
आकडा 20,700 कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून, ही मागील 13 वर्षातील सर्वाधिक
वाढ आहे. तर, 2019 च्या तुलनेत हा 212% म्हणजेच 3.12 पट जास्त आहे. ही
माहिती स्विट्जरलंडच्या केंद्री बँकेने केलेल्या वार्षिक
अहवालातम्हटले आहे
या आकडेवारीत भारतातील बँका आणि इतर आर्थिक संस्थांच्या पैशांचाही समावेश आहे. स्विस बँकांमधील रक्कम वाढल्यामुळे सिक्योरिटीज आणि इतर गोष्टींमधून होल्डिंग्स मोठ्या प्रमाणात वाढल्या. परंतु, कस्टमर डिपॉजिटमध्ये सलग दुसऱ्या वर्षी घट झाली.
अहवालात अजून काय ?
स्विस नॅशनल बँकेच्या (SNB) डेटानुसार, यापूर्वी 2006 मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांचे 52,575 कोटी रुपये जमा होते. यानंतर 2011, 2013 आणि 2017 मध्ये यात घट झाली. बँकेने म्हटले की, आम्ही या पैशांना 'काळे धन' म्हणू शकत नाही. या आकड्यांमध्ये भारतीय नागरिक, NRI किंवा इतर लोकांचे थर्ड कंट्री एंटिटीजद्वारे पैसे जमा झालेले नाहीत.
ब्रिटेन 30.49 लाख कोटी रुपयांसह टॉपवर
2020 च्या अखेरपर्यंत स्विस बँकेत 161.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. यात इतर देशातील 48.53 लाख कोटी रुपये आहेत. ब्रिटेन 30.49 लाख कोटी रुपयांसह टॉपवर आहे. दुसऱ्या नंबरवर 12.29 लाख कोटींसह अमेरिका आहे. याशिवाय, 10 देशांमध्ये वेस्टइंडीज, फ्रांस, हाँगाँग, जर्मनी, सिंगापोर, लक्जमबर्ग, केमेन आइलंड आणि बहामासचा समावेश आहे.डिपॉजिटमध्ये 6% घट
रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, यापूर्वी दोन वर्षे स्विस बँकांमधील भारतीयांच्या पैशात घट पाहायला मिळाली होती. 2019 च्या अखेरीस स्विस बँकांमध्ये भारतीय आणि भारतीय कंपन्यांचे 6,625 कोटी रुपये होते. हा आकडा 2018 पेक्षा 6% कमी होता.बँकेने सांगितल्यानुसार, स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय कंपन्यांचे 2020 च्या अखेरपर्यंत जमा असलेल्या 20,706 कोटींच्या रकमेपैकी 4,000 कोटी कस्टमर डिपॉजिट, 3100 कोटी इतर बँकातून आलेले, 16.5 कोटी ट्रस्टद्वारे आलेले आणि 13,500 कोटी रुपये बॉन्ड, सिक्योरिटीज आणि इतर आर्थिक पर्यायांमधून आलेले आहेत.
Post a Comment