माय वेब टीम
‘द फॅमिली मन 2’च्या जबरदस्त यशानंतर याच्या तिसऱ्या भागाचेही शूटिंग सुरू झाले आहे. या सीरिज आणि आपल्या करिअरविषयी अभिनेता मनोज वाजपेयीने ‘दिव्य मराठी’शी सवांद साधला.
- या सीरिजमध्ये तुम्ही खूप अॅक्शन करताना दिसले. काय अवघड वाटले?
यात बरेच अॅक्शन दृश्य होते. ते करण्यास बरीच ताकद आणि सराव करावा लागला. ही एक वेगळ्या प्रकारची अॅक्शन होती. यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागली. सीरिजचे शेवटचे 7 मिनिटाचे अॅक्शन दृश्यात माझ्या जीवावर बेतले होते. ते दृश्य केल्यानंतर घरी गेल्यानंतर आम्हाला गरम पाण्यात पाय बुडवून बसावे लागत होते.
- अभिनयाव्यतिरिक्त मनोज आणखी काय करु शकतात ?
मी अभिनयाव्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. माझ्याकडून अभिनय हिसकावून घेतला तर मी बेरोजगार होईल. मी याच्या व्यतिरिक्त जीवनात काहीच केले नाही. मोबाइलमध्ये काही नवीन अॅप्लीकेशन आले तरी ते शिकण्यासाठी माझा जीव जातो. माझ्याकडून अभिनय हिसकावून घेतला तर मी काहीच कामाचा माणूस नसणार.
- ओटीटीवर कलाकारांची गर्दी वाढत चालली आहे ?
आज ओटीटीवर पंकज त्रिपाठी, अली फजल, नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वच मोठे कलाकार आहेत. आजच्या तारखेत मी यांच्याकडून काम शिकत आहे. मी काही स्टार नाही. कृपया करुन मला स्टारच्या श्रेणीत टाकू नका. मी स्वत:ला एका छोटा-मोठा कलाकार मानतो
- ‘सत्या’ते आजपर्यंत तुला काेणते पात्र आवडते ?
मी सर्वच पात्रांसोबत न्याय केला आहे. सर्वच मेहनतीने साकारले आहे. त्यामुळे सर्वच पात्र माझ्या हृदयाच्या जवळ आहेत.
- आगामी काळात काय नवीन करणार आहे ?
‘सत्यजीत रे’यांच्या पाच कथांवर आधारित एका तासाचा चित्रपट अभिषेक चौबेने बनवला आहे. त्याच्या एका कथेत मी दिसणार आहे. ही सीरिज 25 जून रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे. या व्यतिरिक्त ओटीटीसाठी आम्ही एक चित्रपट केला आहे, त्याचे नाव ‘डायल 100’ आहे. तोदेखील 4 ते 5 महिन्यात येणार आहे. याशिवाय कन्नू बहलसोबत शूटिंग करत आहे. चौबेजीसोबत आणखी एक प्रोजेक्ट आहे. एकूणच सध्या खूप काम आहे.
- सामंथाने चांगले काम केले. तिच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता ?
आमचा एक अॅक्शन दिग्दर्शक आहे. म्हणजेच त्यांनी सामंथाला एक खास प्रकारचे मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच सामंथा सेटवर आली होती. शूटिंगसाठी ज्या प्रकारचे अॅक्शन सीन सामंथाने केले ते कौतुकास्पद आहे.
Post a Comment