42 दिवसात 24 वेळेस इंधन दरवाढ, 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे


माय वेब टीम 

देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, "मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.' सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही."

148 जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे
देशात प्रथमच डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. इतकेच नव्हे तर सध्या देशातील 148 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. 9 राज्यांचे लोक 100 रुपये प्रतिलिटर पेट्रोल खरेदी करत आहेत.

येथे पेट्रोल 107 रुपयांवर
मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यात पेट्रोल 107.17 रुपये आणि डिझेल 98.29 रु. प्रति लिटरपर्यंत गेले आहे. मात्र, दिल्लीत पेट्रोल 96.29 रुपये आणि डिझेल 87.28 रु. आहे. या वर्षी 1 मेपासून आतापर्यंत 24 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. 21 दिवस याचे दर स्थिर ठेवले आहेत.

दिलाशाची अपेक्षा नाही : एसबीआय रिसर्च
एसबीआय रिसर्चच्या एका अहवालानुसार, पेट्रोल-डिझेलवर लागू जीएसटी आणि उत्पादन शुल्कातून सरकारला होत असलेले उत्पन्न अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा जास्त आहे. यावर एसबीआयचे समूह आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांच्या म्हणण्यानुसार, महामारीत सरकारी खजिन्यासाठी पेट्राेल-डिझेलचे दर बफरप्रमाणे काम करत आहेत. यात घट येण्याची शक्यता नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post