माय वेब टीम
देशात पबजीवर बंदी असली तरी भारतात खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्समध्ये ९८% विदेशीच आहेत. टेम्पल रन व सब-वे सर्फर असो की, अँग्री बर्ड््ससारख्या गेममधील विषय, व्यक्तिरेखा विदेशी आहेत. त्यात बदल करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. यात यश आले तर आई दुर्गा व कालीसोबत शिवाजी महाराज व झाशीच्या राणीसारख्या देवी-देवता व महापुरुषांवर आधारित देशी गेम्स मुलांना भारतीय मूल्यांसोबत गेमिंगचाही आनंद देतील.
ऑनलाइन गेम्समुळे विदेशी विचारांची होणारी मुलांची मानसिकता रोखणे, स्वदेशी तथा संस्कारी गेम तयार करण्यासाठी डॉ. पराग मानकीकर यांच्या नेतृत्वातील समितीने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्ससाठी (एव्हीजीसी) नॅशनल सेंटर आॅफ एक्सिलेन्स उघडण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टपर्यंत योजनेला अंतिम रूप दिले जाईल. मुंबईत सेंटर आॅफ एक्सिलेन्स स्थापन करण्याची योजना आहे.
विदेशात हिंसाचार, शस्त्रास्त्रांचा भडिमार असलेल्या गेम्सवरच अधिक भर
डॉ. मानकीकर यांनी सांगितले, वेगाने वाढणाऱ्या ‘पॉझिटिव्हिटी मार्केट’मध्ये भारताला विश्वगुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विदेशी गुंतवणूकदार हिंसाचार व शस्त्र असलेल्या गेम्सवर फोकस करतात. २०० अब्ज डॉलरचा व्यवसाय आहे. मात्र, शिक्षण, पर्यटन, व्यवसाय, व्यवस्थापन, लष्करी कौशल्य असलेल्या गेम्सचे प्रचलन वाढत आहे. त्याचे मार्केटही ५० अब्ज डॉलरच्या पुढे गेले आहे. डॉ. मानकीकर सांगतात की, पॉझिटिव्हिटी व्हर्टिकलमध्ये आरोग्य, ध्यान, प्राणायामसारखे कल्याणकारी प्रयोग व बाल मनोरंजनासाठी एव्हीजीसीत भारताकडे कार्यबल आहे, मात्र मोठ्या विदेशी कंपन्यांसाठी काम करत आहे. भारतात गोष्टींची समृद्ध परंपरा आहे. डॉ. मानकीकर यांनी सांगितले की, कोरोनाने जगभरात असंतोष निर्माण केला, मात्र त्यातून दया, सद्भावना, सकारात्मक विचार, वेळेचा सदुपयोगाकडे लक्ष गेले. यामुळे पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये उसळी आली आहे. फक्त अमेरिकतच मेडिटेशन मार्केट १.२ अब्ज डॉलरवर गेले आहे.
असे ४ महाद्वार बनवण्याची शिफारस
- एव्हीजीसी प्रशिक्षण व क्षमता विकास.
- एव्हीजीसी संशोधन व विकास.
- एव्हीजीसी प्रकल्प निर्मिती व सहकार्य.
- एव्हीजीसी स्टार्टअप रोपण व आयपीआर.
अँग्री बर्ड््सऐवजी छत्रपती शिवाजी महाराज
एव्हीजीसीत पंचतंत्राच्या गोष्टी, प्रशिक्षण केंद्र असणार : डॉ. मानकीकर म्हणाले, तरुणांची आवडती भाषा अॅनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग व काॅमिक्स (एव्हीजीसी) आहे. पं. विष्णू शर्मा यांनी पंचतंत्रातून मूल्यशिक्षण दिले होते. एव्हीजीसीतून हेच काम करायचे आहे. यासाठी सेंटर ऑफ एक्सिलेन्सच्या व्हर्च्युअल प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र व राज्य स्तरावर प्रशिक्षण केंद्र उघडण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्र एक्सिलेन्स क्लाऊडशी जोडलेलेे असेल. मोहिमेचे नेतृत्व प्रसारण मंत्रालय करेल.
Post a Comment