देशातील करोनाचा संसर्ग मंदावला... करोनाबळींची संख्या साडेतीन लाखांच्या पार

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. फेब्रवारीमध्ये देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच झाला. दुसऱ्या लाटेत जगात दैनंदिन उच्चांकी रुग्णसंख्या भारतात नोंदवली गेली. करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची उपचारासाठी प्रचंड फरफट झाली. मात्र, आता दुसरी लाटेची तीव्रता कमी होत असून, गेल्या २४ तासांतील करोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे.

देशातील करोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते. देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासादायक आहे. देशात काल दिवसभरात (८ जून) ९२ हजार ५९६ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत एक लाख ६२ हजार ६६४ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या २४ तासांत देशात दोन हजार २१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील २४ तासांत देशात आढळून आलेले नवीन रुग्ण – ९२,५९६

गेल्या २४ तासांत करोनातून बरे झालेले रुग्ण – १,६२,६६४

देशात मागील २४ तासांत झालेले मृत्यू – २,२१९

देशातील एकूण रूग्णसंख्या – २,९०,८९,०६९

आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची संख्या – २,७५,०४,१२६

देशात करोनामुळे झालेले एकूण मृत्यू – ३,५३,५२८

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या – १२,३१,४१५

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post