टीम इंडियाचा खेळाडू आहे दिशा पाटनीचा फॅन, इंग्लंडला सुट्टीवर जाण्याची इच्छा

 


माय वेब टीम 

मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल  (WTC Final 2021) पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडिया यजमान इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची सीरिज खेळणार आहे. या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल होताच सर्व खेळाडूंना बायो-बबलचे कठोर नियम पाळावे लागले. आता फायनलनंतर टेस्ट सीरिज सुरु होण्यास उशीर असल्यानं सर्व खेळाडूंना 3 आठवड्याचा ब्रेक देण्यात आला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीममध्ये गुजरातच्या  अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या 23 वर्षांच्या खेळाडूचा देखील समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय म्हणून त्याची निवड झाली आहे. टीम इंडियात निवड होताच गुजरातच्या या बॉलरनं इतिहास रचलाय.अर्झन भारतीय क्रिकेट टीममध्ये 46 वर्षांनतर निवड झालेला पारशी क्रिकेटपटू आहे. (Parasi cricketer in Team India after 46 years) यापूर्वी भारताकडून फारुख इंजिनिअर (Farokh Enginner) यांनी भारताकडून 1975 साली शेवटची टेस्ट मॅच खेळली होती.

2018-19 च्या मोसमात अर्झान प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने मुंबईविरुद्ध 5 विकेट घेतल्या. अर्झानने मुंबईविरुद्धच्या या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, आदित्य तरे, धृमील मटकर आणि सिद्धेश लाड यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 2019-20 च्या रणजी ट्रॉफीमध्येही तो चमकला. गुजरातकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या मोसमात 8 मॅच खेळून अर्झानने तब्बल 41 विकेट घेतल्या, यात त्याने तीनवेळा 5 विकेट आणि एकदा 10 विकेट घेतल्या. यावर्षी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही अर्झानने त्याचा फॉर्म कायम ठेवला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अर्झानला 9 विकेट तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये 19 विकेट मिळाल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post