माय वेब टीम
मुंबई - आपल्याला बोगस लस दिली गेली असल्याचा आरोप करत बोगस पद्धतीने लसीकरण सुरू असल्याचा दावा मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. या आरोपानं खळबळ उडाली असून, लसीकरण शिबीर आयोजित करून सोसायटीतील ३९० जणांना लस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही, त्याचबरोबर ज्या रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या घटनेनं लस घेतलेले नागरिक हादरले आहेत. या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ‘इंडिया टुडे’ने नागरिकांच्या आरोपाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. सोसायटीच्या आवारातच झालेल्या या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. राजेश पांडे असं शिबिराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, त्याने स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे.
Post a Comment