रविशंकर प्रसाद यांच्याकडून कॉपीराईट कायद्याचा भंग, ट्विटरचं स्पष्टीकरण

 


माय वेब टीम 

नवी दिल्ली - केंद्र सरकार विरुद्ध मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खटके उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी 'डिजिटल मिलेनियम कॉपीराइट' कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट जवळपास तासभर लॉक करण्यात आलं होतं. ट्विटरकडून ही कारवाई एका गाण्यावरून करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये एका गाण्याचा समावेश होता. हे कॉपीराईट कायद्याचं कथित उल्लंघन असल्याचं मानत ट्विटरकडून अकाऊंट विरोधात कारवाई करण्यात आली होती.


कारवाईवरून रविशंकर प्रसाद यांनी सोशल नेटवर्किंग कंपनीवर त्यांच्याच प्लॅटफॉर्मवरून आगपाखडही केली. हा ट्विटरचा मनमानी कारभार आणि आयटी नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा रविशंकर प्रसाद यांनी केला होता.

ट्विटरच्या एका प्रवकत्यानं याची पुष्टी केलीय. 'डीएमसीए नोटीशीच्या कारणास्तव माननीय मंत्र्यांच्या खातं अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आलं होतं. आम्ही संबंधीत ट्विट आमच्याकडे राखून ठेवलं आहे. आमच्या कॉपीराईट नीतीनुसार, कॉपीराईटचा स्वामित्व असणाऱ्या किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे आम्हाला पाठवण्यात आलेल्या वैध कॉपीराईट तक्रारींवर पावलं उचलतो' असं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आलं आहे.

'सोनी म्युझिक एन्टरटेन्मेंट'द्वारे करण्यात आलेल्या एका क्लीपच्या दाव्यामुळे रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती. या क्लीपमध्ये संगीतकार

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post