माय वेब टीम
जळगाव - भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,' असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.
ते आंदोलन करतांना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना..@BJP4Maharashtra@NCPspeaks
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 26, 2021
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 25, 2021
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,' असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.
रोहिणी खडसे यांनी कालही या संदर्भात ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. 'आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ रोजी आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारे केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाहीत, हे तुम्हाला माहीत व्हायला हवे होते,' असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
Post a Comment