फडणवीसांना निमंत्रण नाही; दरेकरांनीही कार्यक्रमावर टाकला बहिष्कार

 


माय वेब टीम 

मुंबई - निमंत्रण पत्रिकेत माझं नाव आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, अशा आशयाचं पत्र देत प्रविण दरेकर यांनी एका कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एका विरोधी पक्षनेत्याचं नाव टाकायचं आणि दुसऱ्याचं नाही टाकायचं हे राजशिष्टाचाराला धरुन नाही असं मतही त्यांनी या पत्रात व्यक्त केलं आहे. कलानगर जंक्शन इथल्या सागरी सेतूकडून बांद्रा कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण आणि मालाड पश्चिम इथल्या कोविड रुग्णालयाच्या हस्तांतरण सोहळ्याचा हा कार्यक्रम आहे. \

या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मिळालं आहे. त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरदेखील आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. यावर दरेकरांनी आक्षेप घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post