गुगल यशात लपलेल्या त्रुटी होताहेत उघड : जाणून घ्या


माय वेब टीम 

टेक दिग्गज गुगल दिवसेंदिवस यशाचे शिखर पादाक्रांत करतेय यात कोणतीही शंका नाही. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे भांडवल १.६ लाख कोटी डॉलरवर (११९ लाख कोटी रुपये) गेले अाहे. मात्र आता स्थिती बदलत आहे. कंपनीत बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी तेवढ्या सामान्य नाहीत. गुगलचे कर्मचारी स्पष्टपणे बोलत आहेत. वैयक्तिक अडचणी जाहीर होत आहेत. निर्णायक नेतृत्व आणि मोठ्या कल्पनांनी जोखमीपासून वाचणे आणि कंपनीची वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका होती.

मात्र, त्यातील काही अधिकारी कंपनी सोडत आहेत आणि त्यांनी असे का केले हे सर्वांना सांगून जात आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनी सोडणारे नोआम बार्डिन यांनी एका ब्लॉगमध्ये लिहिले की, मी कंपनी का सोडतोय यापेक्षा चांगला प्रश्न आहे की एवढा काळपर्यंत का टिकून राहिलो? नाओमने लिहिले की, जोखमीची सहनशीलता घटल्याने इनोव्हेशनची आव्हाने वाईटच होतात.

कंपनीला सोडून जाणारे आणि सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांनुसार, गुगलच्या अनेक समस्या कंपनीचे मनमिळाऊ आणि साधी राहणी पसंत असलेले सीईओ संुदर पिचाई यांच्या नेतृत्वशैलीमुळे निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या पंधरा आणि माजी कर्मचाऱ्यांनी न्यूयॉर्क टाइम्ससोबत बोलताना सांगितले, गुगल मोठी कंपनी असल्याचे अनेक नुकसान सहन करत आहे. यात अक्षम ब्युरोकसी, निष्क्रियतेबाबत पक्षपात आणि सार्वजनिक समजुतीवर स्थिरता सामील आहे. गुगलने प्रमुख व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जी केली. कारण, पिचाई यांनी निर्णय रोखून धरले आणि कारवाईत उशीर केला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post