माय वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळा आला की ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डास माश्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. पावसाच्या पाण्यामध्ये तयार होणाऱ्या डासांमुळे मलेरिया, डेंग्यु सारखे गंभीर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय देखील करता येतात. या उपायांचा आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी जाणून घेऊया अशाच घरगुती उपायांबद्दल..
१. दारं-खिडक्या बंद करुन कापूर जाळावा. कापूराच्या वासाने डास पळून जातात.
२. लसूण पाण्यात टाकून चांगले उकळा. उकळल्यानंतर हे पाणी घरात शिंपडा. लसूणाच्या तिखट वासामुळे डास घरात येणार नाहीत उलट घरातील डास बाहेर जातील.
३. कडुलिंबाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. हा स्प्रेस तमालपत्रावर मारा आणि नंतर हे तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळे डास घरातून पळून जातील.
४. कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा अन् त्याचा दिवा लावा. यामुळे डास तुमच्या जवळही फिरकणार नाहीत.
५. पुदिन्याच्या उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना १-२ पुदिन्याची पानं चोळावी. ज्यामुळे रात्रभर तुमच्याजवळ डास फिरकत नाही.
६. तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत. बऱ्याच वेळा डास चावलेल्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावला जातो. जेणे करुन खाज सुटणार नाही.
Post a Comment