जगातील सर्वात मोठं कुटंब असलेल्या चाना परिवारावर दुःखाचा डोगर..


 माय वेब टीम

जिओनाचे कुटुंब हे मिझोराम येथील रहिवासी असून त्यांचं गाव त्यांच्या कुटुंबामुळे प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर त्यांच्या गावात पर्यटक विशेष त्यांच्यामुळे गावात जातात. जिओना यांच्या कुटुंबातील महिला शेती करुन घरात हातभार लावतात. यामध्ये जिओना यांची पहिली पत्नी प्रमुख भूमिका साकारते.

    जगातील सर्वात मोठं कुटंब म्हणून ओळखलं जाणाऱ्या चाना परिवाराचे कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना यांचे निधन झाल्याने चाना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिओना यांच्या निधनामुळे त्यांच्या ३९ पत्नी विधवा झाल्या असून त्यांची ८९ मुलं पोरकी झाली आहेत. याबाबत मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, जिओना चाना हे १९४२ध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन ग्रुप चानाचे प्रमुख होते. त्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक लग्न करण्यास परवानगी आहे.

    जिओनाचे कुटुंब हे मिझोराम येथील रहिवासी असून त्यांचं गाव त्यांच्या कुटुंबामुळे प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर त्यांच्या गावात पर्यटक विशेष त्यांच्यामुळे गावात जातात. जिओना यांच्या कुटुंबातील महिला शेती करुन घरात हातभार लावतात. यामध्ये जिओना यांची पहिली पत्नी प्रमुख भूमिका साकारते. जिओना यांच्या पहिल्या पत्नीने इतर सर्व पत्नींना काम वाटून दिले असून ती त्यांच्यावर लक्ष ठेवते. जिओना यांना १४ सूना आणि ३३ नातवंड आहे. एकूण १८१ लोकांचं असलेलं हे कुटुंब १०० खोल्यांच्या घरात राहतं. हे कुटुंब घराच्या अंगणात, आजूबाजूला शेतात पालक, कोबी, मोहरी, मिरची, ब्रोकोली इत्यादी भाजीपाला पिकवतात. घरातील बागेमुळं या कुटुंबाच्या पैशाची बचत होते. या समाजात आत्तापर्यंत ४०० कुटुंबांची नोंद आहे.

    0/प्रतिक्रिया द्या

    Previous Post Next Post