माय वेब टीम
मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते बुधवारी आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. शिवसेना भवनसमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. या घटनेवर दोन्ही पक्षाकडून कडक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर करत भाजपला इशारा दिला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याचे धडे दिले आहेत. तसेच, त्याचा ‘फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तर तो शिवसैनिक आहे’, बाळासाहेब ठाकरे यांनी भाषणात म्हटले आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) June 16, 2021
शिवसेना भवनसमोरच झालेल्या भाजप शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी कॅप्शन न देता हा व्हिडिओ शेअर केला आहे. माध्यमांशी बोलताना काल त्यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा देत शिवसेना भवनावर मोर्चा काढणे कितपत योग्य आहे याचे उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय ?, असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.
Post a Comment