ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी श्रीरामपूर भाजपाचे उद्या चक्काजाम आंदोलन



माय वेब टीम  

श्रीरामपूर - ओबीसींच्या न्याय हक्कासाठी भाजपाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. येथील शिवाजी चौकातही शनिवार दि. 26 रोजी सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बिंगले यांनी म्हटले आहे की, तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या न्याय हक्काचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पुनःप्रस्थापित होण्यासाठी झोपलेल्या सरकारला जाग आणण्याकरिता शनिवारी शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी यावेळी भाजपा कार्यकर्ते व भाजपप्रेमींनी सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात जमा व्हावे असे आवाहन या पत्रकात बिंगले यांनी केले आहे.

आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गणेश राठी, सुनील वाणी, तालुकाध्यक्ष बबन मुठे, सतिश सौदागर, राम तरस, अनिल भनगडे, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण बोराडे, चंद्रकांत परदेशी, मिलिंद साळवे, अरूण धर्माधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, औद्योगिक आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील चंदन, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रुपेश हारकल, विशाल अंभोरे, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. पुष्पलता बाळासाहेब हरदास, ओबिसी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. किरण सोनवणे आदींनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post