मुदत विमा योजनेचे पाच प्रकार: वैशिष्ट्ये, फायदे, योग्यता – समजून घ्या


 माय वेब टीम 

मुदत विमा योजना फक्त एखाद्याची विद्यमान गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा उद्धेश पूर्ण करत नाही तर भविष्यात कुटुंबातील सदस्यांचं कौटुंबिक ध्येयदेखील सहजतेने पार पाडण्यास मदत करते. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असणाऱ्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास कौटुंबिक ध्येय मोडकळीस येत नाहीत, कारण मिळणारी रक्कम हयात असलेल्या सदस्यांद्वारे वापरली जाऊ शकते. आर्थिक जबाबदारी असणारी प्रत्येक व्यक्ती जो मुदत विमा योजना विकत घेत आहे त्याने एक रुपयांची गुंतवणूकदेखील दीर्घकालीन उद्दीष्टांच्या हेतूने करणं आवश्यक आहे. आर्थिक निर्णय हा प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच एक महत्वाचा राहणार आहे. मुदत योजना ही जीवन विम्यातील सर्वाधिक उत्तम योजना असून कमी प्रीमियम आणि हाय कव्हरेज देते.

कशा पद्धतीने काम करते –
तुम्ही जो प्रीमियम भरणार आहात तो मुख्यत्वे चार गोष्टींवर अवलंबून असेल – विमा रक्कम (लाइफ कव्हर) खरेदी करणं आवश्यक, तुमचं वय, लिंग आणि किती वर्षांसाठी (पॉलिसी टर्म) तुम्हाला ही पॉलिसी हवी आहे. पॉलिसीच्या मुदतीत मृत्यू झाल्यास विमा रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला दिली जाते. तर विमाधारकास (पॉलिसी होल्डर) मॅच्यूरिटी होईपर्यंत जीवंत राहिल्यास काहीही दिलं जात नाही.

म्हणजे समजा की, एखाद्या व्यक्तीने ३० वर्षांसाठी १.५ कोटीची विमा रक्कम असणारी मुदत विमा योजना विकत घेतली. पॉलिसी कालावधी सुरु असतानाच जर त्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला १.५ कोटींची रक्कम एकत्रित दिली जाते.

म्हणजे आता तुम्हाला मुदत विमा योजना कशा पद्धतीने काम करते फक्त याचीच माहिती मिळालेली नसून तिचं महत्वही लक्षात आलं आहे. तर आता मुदत विमा योजनेचे वेगवेगळे प्रकार जाणून घेऊयात…

मुदत विमा योजनेचे प्रकार –

लेव्हल टर्म प्लान 
मुदत विमा योजनेमधील हा अत्यंत बेसिक प्रकार आहे. ज्याप्रमाणे नावातूनच समजत आहे त्याप्रमाणे पॉलिसीच्या पूर्ण कालावाधीत विम्याची रक्कम निश्चित असते. लेव्हल टर्म प्लानमध्ये कालावधी सुरु असतानाच मृत्यू झाल्यास संपूर्ण विमा रक्कम नॉमिनीला एकत्रित दिली जाते. एक विमाधारक म्हणून पॉलिसीचा कालावधी सुरु असतानाच तुमचं निधन झालं तर नॉमिनिला ठराविक रक्कम मिळणार याची तुम्हाला खात्री असते.

रिटर्न ऑफ प्रीमियम प्लान 
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लानमध्ये पॉलिसीधारक पूर्ण कालावधी संपेपर्यंत जिवंत असल्यास प्रीमियम रक्कम परत दिली जाते. या प्लानमध्ये प्रीमियम रक्कम इतर योजना ज्यामध्ये विमाधारकाला मॅच्यूरिटीनंतर काही रक्कम मिळत नाही त्याच्या तुलनेत जास्त असते. पॉलिसीचा कालावधी संपेपर्यंत जिवंत राहिल्यानंतर आपले पैसे परत मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा चांगला प्लान आहे. पॉलिसी कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जातो. यामध्ये प्रीमियम परत दिले जात नाहीत.

इन्क्रिजिंग कव्हर प्लान 
इन्क्रिजिंग कव्हर प्लानमध्ये विमा रक्कम पूर्व-निर्दिष्ट रकमेसह किंवा महागाईडच्या आधारे वेळोवेळी वाढत राहते. याचाच अर्थ मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मूळ रक्कम असू शकत नाही, तर मृत्यू किती वर्षानंतर येतो यावर अवलंबून वाढलेली रक्कम असू शकते. रुपयाची वेळोवेळी घसरण होत असताना अशा योजनांमुळे लाइफ कव्हरचं मूल्य टिकवून ठेवता येतं आणि महागाईनुसार वाढत चाललेली उद्दिष्टं सहज पूर्ण करता येऊ शकतात. यामध्ये पॉलिसीच्या पूर्ण कालावधीत प्रीमियम निश्चित असतो.

डिक्रिजिंग कव्हर प्लान (Decreasing Cover Plan)
वय वाढतं त्याप्रमाणे कुटुबांप्रती असणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्येही वाढ होते. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वेळी पैसे उपलब्ध असण्यापासून ते आपल्या गैरहजेरीत कुटुंबाचा राहणीमान दर्जा समान ठेवण्यास मदत करण्यासाठी पुरेसा कव्हरेज असणं अत्यंत महत्वाचं आहे.

यामुळेच जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यात महत्त्वाचे आर्थिक टप्पे गाठायचे असतील त्या कालावधीत पुरेसा कव्हरेज खरेदी करणं चांगलं आहे. जेव्हा ही जबाबदारी येते तेव्हा कव्हरेज कमी करण्याची गरज उद्भवू शकते. अशावेळी डिक्रिजिंग कव्हर प्लान विमा रक्कम मदतपूर्ण ठरु शकतो, कारण यामध्ये विमा रक्कम वेळोवेळी कमी होत राहते.

अशा योजना गृह कर्जासाठीही उपयुक्त ठरतात जिथे मुख्य थकबाकी वेळोवेळी कमी होत असते. पण जर तुम्ही एखाद्या विशिष्ट हेतूसाठी अशा योजना विकत घेत असल्यास, लेव्हल टर्म प्लानच्या मार्फत तुम्चायाकडे पुरेसं कव्हरेज असेल हे सुनिश्चित करा.

मासिक उत्पन्न कव्‍हर योजना 
मुदत विमान योजनेत पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनिला संपूर्ण विमा रक्कम एकत्रित दिली जाते. पण अशा पद्धतीने एकत्रित मिळालेली रक्कम नॉमिनीकडून योग्य पद्धतीने न वापरली जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मासिक उत्पन्न कव्‍हर योजना फायदेशीर ठरते. यामधून कुटुंबाला उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून विमा राशी मिळण्यास मदत होते.

यामधील काही योजनांमध्ये लाइफ कव्हरचा काही भाग नॉमिनीला एकरकमी दिला जातो तर नियमित मासिक उत्पन्न शिल्लक रकमेवर दिले जाते. काही योजनांमध्ये लाइफ कव्हरच्या संपूर्ण रकमेवर नियमित मासिक उत्पन्न मिळण्याचा पर्याय दिला आहे, तर काही योजना आधी ठरवलेल्या दराने मासिक उत्पन्न वाढविण्याची ऑफर देतात.

निष्कर्ष
मुदत विमा योजनांमधील वेगवेगळ्या प्रकारांची माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरुन तुम्हाला आपल्या विशिष्ट गरजांप्रमाणे खरेदी करण्याचा योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. तुम्ही कोणती योजना खरेदी करता हे महत्वाचं नसून, शक्यतो दर पाच वर्षांनी आपल्या जीवन विमा योजनेच्या गरजेची पुन्हा एकदा पडताळणी करणं गरजेचं आहे. पुरेसा लाइफ कव्हर असल्यास जीवन आणि मृत्यूची अजिबात चिंता न करता आपल्या आयुष्यातील उद्धिष्टांसाठी गुंतवणूक करणं अत्यंत सहज प्रक्रिया होऊन जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post