माय वेब टीम
मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर दिलेल्या भाषणामुळे भाजप नेता आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याप्रकरणी आता कोलकाता पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांनी समन्स पाठवत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. या आधी कोलकाता उच्च न्यायालयानं मिथुन चक्रवर्ती यांना या प्रकरणी मोठा झटका दिला आहे. न्यायाधीश कौशुक चंद यांनी पोलिसांना मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी दिलेल्या वादग्रस्त भाषणावरून कोलकाता पोलिसांनी यापूर्वीही त्यांची चौकशी केली आहे. या वादग्रस्त भाषणानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या विरोधात मानिकलता पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्याठिकाणीही त्यांच्या पदरी निराशाच पडली.West Bengal: Kolkata Police has asked actor & BJP leader Mithun Chakraborty to appear before it on Monday (June 28), via video conference for questioning over his controversial speech during election campaigning for Assembly polls
— ANI (@ANI) June 27, 2021
(File photo) pic.twitter.com/bMsimfHE7L
Post a Comment