..म्हणून यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे


 

माय वेब टीम 

स्पोर्ट्स डेस्क - प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या कारकीर्दीविषयी मोठा खुलासा केला आहे. दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे, असे म्हटले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी रोहित शर्माबाबत अनेक खुलासे केले आहेत.

गेल्या काही वर्षांत रोहित शर्माची कारकीर्द खूप बदलली आहे. सन २०१३ पासून तो एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून उदयास आला, त्यानंतर २०१९ पासून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने वर्चस्व राखले. प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, रोहित सुरुवातीपासूनच अशी फलंदाजी करायचा परंतु २०११ मध्ये निवड न झाल्यामुळे तो खूप दु: खी झाला होता, कारण विराट कोहली त्याच्यानंतर खेळू लागला आणि तो कर्णधार होता.

दिनेश लाड म्हणाले, “एक वेळ अशी होती की २००९ ते २०११ दरम्यान रोहित शर्माने क्रिकेटला वेळ दिला नाही. त्यामुळे त्याचा खेळ खराब झाला. त्याचा आत्मविश्वास देखील डगमगला होता. त्यावेळी मी त्याला तुझी ओळख क्रीकेटमुळे आहे. सरावावर लक्ष दे, नाहितर लोकं तुला विसरून जातील, असे सांगितले. त्यानंतर रोहितने खेळावर लक्ष दिले.”

मात्र, योग्य मार्गदर्शनामुळे रोहितचा खेळ चांगला होता. २०११ पासून त्याचा खेळ सुधारत आहे पण सर्व प्रथम मला त्याच्या यशाचे श्रेय एमएस धोनीला द्यायचे आहे. एमएस धोनीने रोहितवर विश्वास ठेवला आणि त्याला संधी दिली, असे दिनेश लाड म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post