मुंबई - टीम इंडियाचा माजी बॅट्समन संजय मांजरेकरनं (Sanjay Manjrekar) टीम इंडियाच्या पराभवानंतर फायनलमध्ये (WTC Final 2021) दोन स्पिनर्स घेऊन खेळण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला आहे. साऊथम्पटनच्या पिचवर टीम इंडियाने आर. अश्विन (R. Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा अंतिम 11 मध्ये समावेश केला होता. तर न्यूझीलंडने पाच फास्ट बॉलर्स खेळवले होते. पावसाचा फटका बसलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 8 विकेट्सनं पराभव केला.
मांजरेकरनं 'इएसपीएन क्रिकइन्फो' ला बोलताना सांगितले की, "दोन स्पिनर्सना खेळवणे हा नेहमीच वादाचा मुद्दा होता. विशेषत: ढगाळ वातावरण आणि पावसामुळे एक दिवस टॉस उशीरा झाला. तरीही दोन स्पिनर्स खेळवण्यात आले. त्यांनी बॅट्समन म्हणून एक खेळाडू निवडला. तो जडेजा होता. त्याची निवड बॉलिंगसाठी झाली नव्हती. मी या गोष्टीला कायम विरोध केला आहे.
तुम्हाला टीममध्ये नेमक्या खेळाडूंची निवड करायला हवी. पिच कोरडे आणि स्पिनला मदत करणारे असेल तर अश्विनबरोबर जडेजाला निवडणे समजू शकले असते. पण त्यांनी जडेजाला त्याच्या बॅटींगच्या आधारावर निवडले. ते अंगाशी आले. बहुतेक वेळा तेच घडते. "
यापूर्वीही साधला होता निशाणा
संजय मांजरेकरनी जडेजावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 वर्ल्ड कप दरम्यान संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचं वक्तव्य केलं होतं. जडेजाला मांजरेकर यांचं हे वक्तव्य अजिबात आवडलं नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 77 रनची खेळी करून जडेजाने बॅटने तलवारबाजी केली. हे सेलिब्रेशन म्हणजे मांजरेकर यांनाच इशारा होता, असं जडेजानं नंतर स्पष्ट केले होते.
Post a Comment