वेब टीम
जालना - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी असल्याचं म्हटलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणी काहीही बोलतं. आज राज्याचे
प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, अशी आठवण करुन देताना कायद्याने राज्य चालवणं,
नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, असं सांगत अजितदादांनी
एकप्रकारे राऊतांना आरसा दाखवला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख
शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं,
सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत, असं अजित पवार
म्हणाले.
गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.
Post a Comment