हेल्थ डेस्क - करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे अनेकांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या कालावधीमध्ये मानसिक आरोग्य जपणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी एक खास गोष्ट आपल्यापैकी सर्वांनाच मदत करु शकते. नाही नाही आम्ही एखादं शिबीर किंवा योगा किंवा इतर क्लासबद्दल नाही बोलत आहोत आम्ही सांगतोय घरात एखादा पाळीव प्राणी ठेवण्यासंदर्भात. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार पाळीव प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचे दिसून आलं आहे.
घरामध्ये अनेकजण कुत्रा, मांजर पाळतात. या पाळीव प्राण्यांमुळे गोंधळलेलं मन शांत होण्यास मदत होते, असं अनेक प्राणीप्रेमींच म्हणणं आहे. बहुतेकांना हे ठाऊक नसतं की पाळीव प्राणी मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात. काही वर्षांपूर्वी पाळीव प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असा अभ्यासही समोर आला होता. इंग्लडमधील मँचेस्टर विद्यापीठातील लेखक हेलन ब्रुक्स यांनी याबाबत माहिती दिलीय. “ज्या मानसिक रुग्णांनी आमच्या संशोधनामध्ये सहभाग नोंदवला होता त्यांनी मनुष्याच्या जीवनात पाळीव प्राणी अनेक सकारात्मक भुमिका पार पाडतात, असं मत नोंदवलं. मानसिक रुग्णांना आपला मानसिक आजार स्वीकारण्यास आणि त्याबाबतच्या न्यूनगंडापासून परावृत्त करण्यास पाळीव प्राणी मदत करतात, असे त्यांचे म्हणणे होते,” अशी माहिती ब्रुक्स यांनी दिली. चला तर मग पाळीव प्राणी कशाप्रकारे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात याबाबत जाणून घेऊयात…
१. ताणतणाव कमी होण्यास मदत
करोना, घरगुती कर्तव्ये, कार्यालयीन काम इत्यादींसह दैनंदिन कामकाजामुळे बर्याच लोकांना प्रचंड ताणतणावाला सामोरे जावे लागतेय. पाळीव प्राण्यांसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तणाव कमी होऊ शकतो. तणाव कमी झाल्यावर मनही शांत होते. यामुळे अडचणीचा सामना करण्याचे बळ मिळते. तसेच, विचारांमधील नकारात्मकता कमी होऊन आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळतो.
२. फिजीकल हेल्थ
तुम्ही एखाद्या प्राण्याचे पालकत्व स्वीकारले असल्यास त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर त्यांच्यामागे किती कसरत करावी लागते याबाबत तुम्हाला कल्पना असेलच. प्राण्यांना फेर फटका मारुन आणण्याच्या निमित्ताने अनेकजण दररोज माॅर्निंग वाॅकला जातात. त्यामुळे स्वास्थ्याही छान राहते. तसेच दिवसभर उत्साह कायम राहतो. रात्री शतपावली केल्यामुळे अन्नपचनासही मदत होते. तसेच, इतर प्राणी मित्रांसोबत पेट क्लब्स आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढतो. सोशल लाईफ सुधारण्यास मदत होते.
३. मानसिक आधार
पाळीव प्राण्यांच्या सहवासात कोणत्याही अटीशिवाय मानसिक आधार मिळु शकतो जो कुटुंब, नातेवाईक वा मित्र-मैत्रिणींकडून मिळू शकत नाही.
Post a Comment