राहुल गांधी यांचे मोदी सरकारला प्रश्न : म्हणाले कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत डेल्टा प्लस ...


माय वेब टीम 

हेल्थ डेस्क - कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लसबाबत देशभरात चिंता वाढत आहे. नुकतचे मध्यप्रदेशात याचे 7 रुग्ण आढळले असून यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आण‍ि खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी मोदी सरकारला घेराव घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला तीन प्रश्न केले असून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत डेल्टा प्लसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय योजना आहे याबाबत विचारणा केली आहे. 


 राहुल गांधी यांनी हे तीन प्रश्न विचारले आहे?

 1. डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचणी का केली जात नाही?

2. लस यावर किती प्रभावी आहे, याची संपूर्ण माहिती कधी उपलब्ध होईल?

3. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय योजना आहे?

भारतातील तीन राज्यांना इशारा
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आण‍ि केरळ राज्यांला यासाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे.

डेल्टा प्लसचे तीन वैशिष्ट्ये

1. ते फार वेगाने पसरते.

2. यामुळे फुफ्फुसांना लवकर नुकसान पोहचते.

3. मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी थेरपीचा प्रभाव कमी करते.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलास विविध नावे देण्यात आली आहेत. देऊन भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले. B.1.617.2 मध्ये आणखी एक म्यूटेशन K417N झाले आहे. हा व्हेरिएंट यापूर्वीच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमधूनच आहे. यातूनच तयार झालेल्या नवीन व्हेरिएंटला डेल्टा प्लस किंवा AY.1 आणि B.1.617.2.1 असे म्हटले जात आहे. K417N म्यूटेशन झालेले नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरते. यावर व्हॅक्सीन आणि औषधींचा प्रभाव सुद्धा कमी पडतो.

डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

  • डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
  • भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
  • डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
  • जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post