माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क ; कोरोना महामारीत लोकांची जीवनशैली महत्त्वाची झाली आहे. आराेग्यासंदर्भातील जागृतीही वाढली आहे. त्याचबराेबर काेराेना संसर्ग हाेण्याच्या भयाने काही जण चिंतेत आहे. लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ घरात राहावं लागल्यामुळे, एका जागी तासनतास काम, व्यायामाचा अभाव आणि तणाव त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांनी घेरलं आहे. त्यामुळे आम्ही य़ेथे आरोग्यदायी गोष्टींची माहिती देच आहोत. असं एक सुपरफूड आहे, ज्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहिल. ते सुपरफुड म्हणजे शेवग्याची भाजी होय.
मृग नक्षत्र सुरू झाला आहे. या दिवसात बाजारात शेवग्याची भाजी मुबलक प्रमाणात दिसते. वर्षा ऋतुत आपल्याकडे शेवग्याची भाजी खातात. शेवग्याच्या शेंगा, पाला, बिया सर्वच आपल्यासाठी खूप गुणकारी आहे. शेवग्याची भाजी खाऊन पावसाचे स्वागत करा आणि आपली परंपरा नक्की जपा. या भाजीचे सेवन करून अनेक आरोग्याच्या समस्या आपल्यापासून दूर ठेवा.
मोरिंगा म्हणजे काय ?
मोरिंगा म्हणजेच शेवगा होय. यास सुपरफूडही म्हणतात. कारण, जर तुम्ही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सुपरफूड शोधात असाल तर शेवग्याच्या भाजीचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. याला ड्रमस्टिक ट्री, चमत्कारी ट्री आणि लाईफ ऑफ ट्री म्हणूनही ओळखलं जातं. मोरिंगा पावडर मोरिंगाच्या भाजीपासून बनवतात. यामध्ये खूप सारे औषधी गुण आहेत. या सुपरफूडचा वापर हजारोंवर्षांपासून आयुर्वेदिक उपचारात केला जात आहे.
विटॅमिन्सने भरपूर
शेवग्याची भाजी लोह, कॅल्शियम, विटॅमिन सी, विटॅमिन बी ६ आणि रायबोफ्लेविनचे चांगले स्रोत मानले जाते. शिवाय पोटेशियम, विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि मॅग्नीशियमची मात्रादेखील अधिक असते. दुधापेक्षा अधिक कॅल्शियम आणि संत्रीपेक्षी अधिक सी - विटॅमिन यामध्ये असते.
शेवग्याची भाजी खाण्याचे फायदे काय?
शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे पोटातील कृमी मरतात. ही भाजी दृष्टी आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. हाडांचे आरोग्य आणि त्वचा व केस चमकदार होण्यासाठी ही भाजी गुणकारी आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
प्रथिनांची मात्रा अधिक
डाळी आणि सोयाबीनमध्ये प्रथिनांची मात्रा खूप अधिक असते. आपण प्रोटिनसाठी बाजारातून प्रोटिन पावडर आणतो. पण, ही भाजी खाल्ल्याने प्रोटिनची कमतरता भरून निघेल. यासाठी स्मूदी वा सूपमध्ये मोरिंगा पावडर मिसळा. कारण, भाजीपासून बनवलेले मोरिंगा पावडर प्रोटीनने भरपूर असतात. एक चमचा पावडरमध्ये ३ ग्रॅम प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमीनो ॲसिड असतात. जे स्नायूंना बळकट करते.
हार्मोन्स संतुलित करते
हार्मोन्स संतुलित करण्यासाठी हे भाजीचं सेवन केलं जातं. मेनोपॉजमुळे ज्या महिलांचे हार्मोन असंतुलित होतात, त्यांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. मोरिंगा घेतल्याने महिलांसाठी मदतशीर ठरू शकते. मोरिंगा थायरॉयड समस्येतही सुधारणा करू शकते. मोरिंगा शक्ती, झोप आणि डायजेशनशी संबंधित हार्मोनला नियंत्रित करते.
लिवरचे संरक्षण
या भाजीतील गुण रक्त शुध्द करते. फॅट मेटाबोलाईज करते. लिवरच्या संरक्षणासाठी भाजी गुणकारी आहे.
सूज कमी करते.
हळद सूज कमी करण्यासाठी सर्वात चांगले मानले जाते. परंतु, मोरिंगा पावडर सूज कमी करण्यासाठी मदतशीर ठरते.
रक्तातील साखर संतुलित करण्यास मदतशीर
इन्सुलिन आणि ब्लड शुगर वाढल्यामुळे मूड स्विंग आणि शुगरची समस्या होऊ शकते. कधी कधी टाईप-२ डायबिटीज आणि स्थूलपणाही येऊ शकतो.
फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदतशीर
फ्री रेडिकल्स प्रदूषण, तळलेले पदार्थ आणि सूर्याच्या संपर्कात आल्याने होतात. यामुळे लवकर वृध्दत्व, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि आपल्या स्नायूला नुकसान पोहोचवतात. मोरिंगामध्ये फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल्स आणि एस्कॉर्बिक ॲसिड यासारखे अँटीऑक्सीडेंट भरपूर असतात.
पचनक्रियेसाठी उपयुक्त
शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये जवळपास ३० टक्के फायबर असतात. मोरिंगा एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटीबॅक्टीरियल असतात. विभिन्न समस्यांचा विकास रोखण्यासाठी मदतशीर ठरते. मोरिंगातील अँटीइंफ्लेमेटरी गुण पचनक्रियेसंबंधी जसे की कोलायटिस वगैरे दूर करण्यास मदत करते.
- माहिती संग्रहित
Post a Comment