वेब टीम
कोल्हापूर - मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाची हाक दिली आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पावसानेही आंदोलनात 'हजेरी' लावून मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार ठरला आहे. भर पावसात संभाजीराजे, मालोजीराजे, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते खाली बसले आहे.
कोल्हापूरमध्ये आज मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून शहरात पावसाने हजेरी लावली होती. सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात केली.
पण, आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आणि सर्वपक्षीय नेते आंदोलनात सहभागी झाले आहे. समाथीस्थळासमोर हिरवळीवर संभाजीराजे यांच्यासह सर्व नेते खाली बसले आहे. तर समोर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार आपली भूमिका मांडत आहे.
संभाजीराजे यांनी आधीच हे मूक आंदोलन आहे, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत ते बोलणार नाही. दुपारी 1 वाजेच्या सुमारास संभाजीराजे जनतेला संबोधित करून आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, याबद्दल भूमिका जाहीर करतील.
Post a Comment