दहशतवाद्यांनी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून केला गोळीबार, एसपीओ आणि त्याची पत्नी ठार


 माय वेब टीम 

नवी दिल्ली  - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसातील एका विशेष पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली आहे. ही घटना अवंतीपोरातील हरिपरिगाम येथे रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी बंदूकीसह जबरदस्तीने एसपीओच्या घरात घुसून बेछूट गोळीबार केला. दरम्यान, यामध्ये एसपीओ फैयाज अहमद (41 वर्ष) त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर काही वेळेतच एसपीओ अहमद आणि त्यांची पत्नीने जीव सोडला.

काश्मीर झोन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या परिसराला वेढा घातला गेला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलींची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एसपीओ अहमद यांची मुलगी राफियाची प्रकृती चिंताजनक असून तीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल सोफी यांनीदेखील रफियाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

मंगळवारी सीआयडी इन्स्पेक्टरची हत्या
दहशतवाद्यांनी मंगळवारी श्रीनगरमधील नौगाम भागात एका सीआयडी निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती. दरम्यान, दहशतवाद्यांनी नऊगाम पोलीस स्टेशन परिसरातील कानिपोरा येथील त्यांच्या घराजवळ निरिक्षक अहमद डार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी अहमद हे नमाज अदा करुन घरी परतत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post