माय वेब टीम
इंस्टाग्रामने रील्स आणल्याने टीकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. आता इंस्टाग्राम हा पर्याय अनेकांनी वापरावा यासाठी आणखी एक कारण घेऊन येत आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या इंस्टाग्राम आता “बोनस” फीचरवर काम करत असून त्याद्वारे रील्स बनवणारे पैसे कमवू शकणार आहेत.
इंस्टाग्राम आता रील्समध्ये काही नविन पर्याय उपलब्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. अँड्रॉइड आणि IOS डेव्हलपर असणाऱ्या अलेस्सॅन्ड्रो पालुझी (Alessandro Paluzzi) यांच्या म्हणण्यानुसार इंस्टाग्राम रील्स युजर्सना मॉनिटरी बोनस म्हणजेच पैसे देण्याची योजना आखत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Paluzzi हे काही बॅक एंन्ड कोड संदर्भात शोध घेत असताना त्यांना ही माहिती मिळाली आहे. याचा स्क्रीनशॉर्ट त्यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे. यानुसार इंस्टाग्राम युजर्सना आपल्या आवडत्या रिलला शेअर करण्यात सांगण्यात येईल. त्यानंतर त्यांना यानंतर, त्यांना काही मर्यादा पूर्ण केल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे. मात्र पैसे मिळवण्याच्या संपूर्ण निकषांचा खुलासा अद्याप झालेला नाही.
गेल्या वर्षी स्नॅपचॅटने देखील आपल्या युजरपैकी सर्वात जास्त मनोरंजन करणाऱ्या व्हिडिओ क्लिपला एक हजार अमेरिकन डॉलर देण्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त युट्यूबने देखील ‘Shorts Funds’ची घोषणा केली होती ज्याद्वारे युट्यूब शॉर्ट क्रिएटर्सना १०० मिलियन अमेरिकन डॉलर देण्याची घोषणा केली होती.
अलीकडेच, इन्स्टाग्रामने रील आणि लाइव्हसाठी इनसाईट सपोर्टची घोषणा केली आहे. ज्याने क्रिएटर आणि व्यवसाय सुधारण्यात मदत करेल. युजर्सचा कंन्टेट कसा चालत आहे हे यामधून कळणार आहे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. इन्स्टाग्राम मेट्रीक्समध्ये आता प्ले, अकाऊंट रीच, लाईक्स, कमेंन्ट, सेव्ह आणि शेअर याची माहिती मिळणार आहे.
Post a Comment