माय वेब टीम
पुणे - राज्यातील कोविड (Corona Virus) रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे.
पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसंच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यात लसीकरण वेगानं सुरु आहे. परदेशात तिसरी लाट फार वेगाने वाढलीय आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताहेत हे थांबलं पाहिजे. लहान मुलांना धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे, असं वळसे- पाटील म्हणालेत.
पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री ((Deputy Chief Minister Ajit Pawar))तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली.
Post a Comment