चंद्रपूर - शेतावरून घरी परतत असताना नाल्याला आलेल्या पुरात ट्रॅक्टर उलटून सहा जण वाहून गेल्याची घटना (राजुरा तालुक्यातील देवाडा येथे रविवारी सायंकाळी घडली. यातील मायलेकीचा मृत्यू, तिघे बचावले तर एकाचा शोध सुरू आहे.
- मान्सूनचा पाऊस झाल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. देव्हाडा शिवारात पेरणीच्या कामासाठी काही मजूर गेले. सायंकाळी काम संपवून घरी परतत असताना गावाजवळील नाल्यात ट्रॅक्टर फसला. याच सुमारास दमदार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला.
अचानक आलेल्या या पुरात ट्रॅक्टर उलटून माधुरी विनोद वंगणे (२७), मल्लेश शेंडे (४५), लक्ष्मी विनोद वंगणे (७), राजू डामिलवार, बाधू कुमरे व बालवीर हे वाहून जाऊ लागले. माधुरी आणि लक्ष्मी यांचा बुडून मृत्यू झाला. इतर तिघे सुखरूप बचावले तर मल्लेश यांचा शोध सुरू आहे.
Post a Comment