माय वेब टीम
अहमदनगर -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान भाजपचे (BJP) चक्काजाम आंदोलन आज (शनिवार) नगर करण्यात आले . शहरातील सक्कर चौक (Shakkar Chauk) येथे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनात खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe), प्रदेशचे उपाध्यक्ष राम शिंदे (Ram Shinde), माजी आमदार शिवाजी कर्डीले(Shivaji Kardile), भैय्या गंधे (Bhaiyya Gandhe), अभय आगरकर (Abhay Agarakar), सुनील रामदासी (Sunil Ramdasi), सुवेंद्र गांधी (Suvendra Gandhi), मनोज कोकाटे (Manoj Kokate), अंजली वल्लाकटी (Anjali Vallakati), अक्षय कर्डीले (Akshay Kardile) आदी प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीविरोधात घोषणा देण्यात आल्या.
Post a Comment