श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील (Shrirampur City) मेनरोडवर सुमारे 23 हजार रुपयांचा ऐवज असणारी बॅग (Bag) अज्ञात चोरट्याने चोरून नेली ( Stolen by unknown thief )आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वॉर्ड नं. 7, वढणे वस्ती येथे राहणार्या सुषमा सुशांत सातदिवे (वय 34) 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अमोल फूट वेअर (Amol Foot Wear) ते नटराज बुक स्टॉल (Nataraja Book Stall) दरम्यान आपली 23 हजार 500 रुपये ऐवजाची त्यात सोन्याचे दागिने (Gold jewelry), पॅन कार्ड (Pan Card), आधार कार्ड (Adhar Card), बँकेचे एटीएम (Bank ATM Card) इतर कागदपत्र असलेली बॅग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
याप्रकरणी सुषमा सुशांत सातदिवे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 429/2021 प्रमाणे अज्ञात चोराविरोधात भा.दं.वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय सानप (PI Sanjay Sanap) यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. काळे पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment