महामारीत मृत्यूचा आकडा 4 लाखांच्या पुढे, दुसऱ्या लाटेत 2.50 लाख लोकांनी जीव गमावला


माय वेब टीम 

मुंबई - देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्युंची संख्या गुरुवारी 4 लाखांच्या वर गेली आहे.यात दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. म्हणजे हे मृत्यू मार्चनंतर झालेले आहेत. या दोन राज्यांत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. केरळमध्ये तर नवे रुग्ण आता पुन्हा वाढू लागले आहेत.

गेल्या 16 महिन्यांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. येथे १.२२ लाख मृत्यू झाले असून देशाच्या तुलनेत ही संख्या ३१ टक्के आहे. यानंतर कर्नाटकात ३५ हजार, तामिळनाडूत ३३ हजार मृत्यू झाले. या हिशेबाने देशात एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू फक्त महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूत झाले आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळून आलेले एकूण रुग्ण : 43,169
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 782
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 54,246
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण : 3.04 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.95 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णाची संख्या : 5.05 लाख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post