माय वेब टीम
कोल्हार - राहाता (Rahata) तालुक्यातील कोल्हार बुदुक (Kolhar Budruk) येथे एका जणाने निधी मंजुरीसाठी (Fund) ग्रामविकास अधिकारी शशीकांत चौरे यांच्याकडे पैशाची मागणी (Demand Money) करत 26 हजार 500 रुपये घेऊन आर्थिक फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा (Loni Police station) दाखल करण्यात आला आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सीएसआर या कंपनीचे योजनेमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हार सोलर शैक्षणिक व स्वच्छ भारत योजनेसाठी निधी मंजुरीसाठी अनिरुद्ध टेमकर याने कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. ग्रामविकास अधिकारी श्री. चौरे यांच्याकडून अनिरुध्द टेमकर याने 26 हजार 500 रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी शशीकांत अनाजी चोरे यांनी लोणी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 294/2021 प्रमाणे अनिरुद्ध टेमकर, (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 406 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. लबडे हे पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment