मुंबई - देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला. पण नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
दरम्यान, सरकारने आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झाली आहे. जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय, अशी टीका देशपांडेंनी केली.
Post a Comment