अकोले (Akole) तालुक्यातील अंबड (Ambad) येथील एका व्यक्तीवर दीड महिन्यांपूर्वी हा प्रसंग उद्भवला होता. फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून त्याची संगमनेर (Sangmner) येथील एका तरुणीशी ओळख झाली. सदर महिलेने त्याच्यासोबत ओळख वाढवून नंतर संगमनेर येथे भेटीसाठी बोलावले. शहरातील शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची भेट झाली. या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर सदर महिलेने सदर इसमास गणेश नगर येथे तिच्या मावशीच्या घरी नेले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर शहरात काही महिन्यांपूर्वी आणि हनी ट्रॅप प्रकार उघडकीस आला होता संगमनेरातही आता असा प्रकार करणार्या महिलांची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सदर महिलांनी यापूर्वीही वेगवेगळ्या पुरुषांसोबत असे प्रकार केल्याचे समजते. मात्र याबाबत कोणी तक्रार केली नव्हती आज सदर इसमाने याबाबत तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी सबंधित महिलांना विरोधात भादंवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा महिलांपासून सावध राहावे
फेसबुक व्हॉट्सअॅप याचा वापर करून एखादी महिला जवळीक वाढवत असेल तर अशा महिलांपासून नागरिकांनी सावध राहावे. त्यांच्यासोबत चॅटिंग करू नये असा प्रकार कुणाच्या बाबत घडत असेल तर त्याने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी केले आहे..
Post a Comment