'बालिका वधू'मधील दादी सा काळाच्या पडद्याआड



माय वेब टीम 

मुंबई  | 

प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. बालिका वधू या गाजलेल्या मालिकेत त्यांनी दादी साची भूमिका साकारली होती. 'बधाई हो' या चित्रपटानंतर सुरेखा यांच्याकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नव्हता. म्हणूनच गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र शासनाने शूटिंगसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांवर घातलेली बंदी हटविण्याची मागणी केली होती.

दोन वर्षांत दोनदा ब्रेन स्ट्रोक
सुरेखा सीकरी या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. 2018 मध्ये महाबळेश्वर येथे एका टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोनचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे वृत्त आले होते. कालांतराने त्या यातून ब-या झाल्या होत्या.

लॉकडाऊनदरम्यान 2020 मध्ये त्यांना पुन्हा ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यावेळी आयसीयूत त्यांच्यावर उपचार झाले होते. त्यांच्या मेंदुत झालेले ब्लड क्लॉट औषधांनी बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

मदतीबद्दल म्हणाल्या होत्या - मला भीक नकोय
सुरेखा सीकरी यांनी त्यांच्या अडचणीच्या काळाबद्दल सांगताना म्हटले होते की, 'अ‍ॅड फिल्मच्या ऑफर माझ्यासाठी पुरेशा नाहीत, मला अधिक काम करावे लागेल. कारण वैद्यकीय बिले वगळता माझे इतरही बरेच खर्च आहेत पण निर्माते कोणतीही रिस्क घेऊ शकत नाहीत. लोकांनी मला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला, ज्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण मी कोणाकडूनही कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. मला काम द्या. मला सन्मानाने पैसे कमवायचे आहेत.'

50 वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात घालवला

  • सुरेखा सीकरी हे हे भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध नाव होते. 1978 मध्ये आलेल्या 'किस्सा कुर्सा का' या चित्रपटातून सुरेखा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.
  • दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते.
  • सुरेखी सीकरी यांची 'बालिका वधू' मालिकेतील 'दादी सा' ही भूमिका चांगलीच गाजली होती. या भूमिकेतून त्या घराघरांत पोहचल्या होत्या..
  • सुरेखी सीकरी यांना 1989 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 'तमस', 'मम्मो', आणि 'बधाई हो' या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • त्या अखेरच्या झोया अख्तरच्या घोस्ट स्टोरीजमध्ये दिसल्या होत्या. याचा प्रीमिअर नेटफ्लिक्सवर झाला होता. सुरेखा सीकरी यांचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगा असून राहुल सीकरी हे त्याचे नाव आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post